Jayant Patil: '...म्हणून अमेरिका वेगाने प्रगती करु शकला'; जयंत पाटलांचा भाजपाला टोला | America | BJP
'अमेरिकेत कोणत्याही धर्माचा, जातीचा भेदभाव नाही त्यामुळे तो देश वेगाने प्रगती करु शकला. त्याचपध्दतीने भारताची प्रगती आपण सर्व धर्मनिरपेक्ष विचाराने आजपर्यंत करत आलो आहोत. मात्र आता अशा भूमिका भाजपाचे काही प्रमुख नेतेच मांडणार असतील तर ती चिंतेची बाब आहे. देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि "भारत हे हिंदू राष्ट्र होते हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रच राहिल" असलेले ट्वीट भाजपच्या ट्वीटर पेजवर करण्यात आले ' असं राष्ट्रवादी नेते जयंत पाटील म्हणाले